
रिक्षाला धडक देवून पलायन केलेल्या ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल
रत्नागिरी ः उभ्या असलेल्या रिक्षेला पाठिमागून धडक देणार्या ट्रक चालक अशोक रामभाऊ झोरी याच्या विरोधात पाली पोलीस दूरक्षेत्रात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाणीज गावातील श्रीराम गजानन दाणी यांनी आपली रिक्षा रस्त्याच्या कडेला उभी करून ठेवली होती. साखरप्याच्या दिशेने जाणारा चालक अशोक झोरी याचा ट्रकवरील ताबा सुटून तो थेट रिक्षावर जावून आदळला. अपघात घडल्याचे वृत्त समजताच चालकाने पलायन केले. स्थानिक ग्रामस्थांनी पाठलाग करून अशोक झोरी याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.