
गुहागर-विजापूर मार्गावरील चिपळूण शहराजवळील खड्डा बुजविण्याची मागणी, युवा सेना आक्रमक
गुहागर-विजापूर मार्गावर चिपळूण शहराजवळील साखरवाडी दत्त एजन्सी फाटा येथे मोठा खड्डा पडला आहे. या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत. याबाबत चिपळूण युवासेना आक्रमक झाली. महामार्ग अधिकार्यांशी चर्चा करून हे खड्डे त्वरित भरले जावेत, अशी मागणी केली. अखेर अधिकार्यांनी हे खड्डे भरले जातील, असे आश्वासन दिले. हे खड्डे भरले गेले नाहीत तर शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, असे शहरप्रमुख निहार कोवळे यांनी सांगितले. यावेळी उपतालुकाप्रमुख ऋषिकेश नलावडे, शाखाप्रमुख हेमंत मोरे, उपशहरप्रमुख पार्थ जागुष्टे, विनायक रेडीज व पदाधिकारी उपस्थित होते.
www.konkantoday.com