
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना चाचण्यांचं प्रमाण दुपटीने वाढविण्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना चाचण्यांचं प्रमाण दुपटीने पटीने वाढवा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल प्रशासनाला दिल्या. ते कोरोना नियंत्रणासाठी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीनंतर बोलत होते. तसेच अजित पवार यांनी यावेळी आपल्या जिल्ह्यातील कोरोनाची ही स्थिती कमी करण्यासाठी जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन कोल्हापूरच्या जनतेला केलं. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील उपस्थित होते.
www.konkantoday.com