
आमदार शेखर निकम यांनी अंत्रवली गावाला भेट देऊन गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या
कोकणवासीयांच्या समस्या आणि लोकसेवकांचे दुर्लक्ष या टीकेला छेद देत आमदार शेखर निकम यांनी अंत्रवली गावाला भेट देऊन गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
येथील सुर्वे वाडी, बुद्ध वाडी, मोहल्ला, माईनवाडी, मालपवाडी, गवाळवाडी येथील ग्रामस्थांशी आमदार निकम यांनी संवाद साधला. यावेळी सरपंच सारंगी सुर्वे ग्रामपंचायत सदस्य लियाकत नेवरेकर शर्वरी मालप तेजस सुर्वे अनंत माईन मंगेश सुर्वे पप्पू सुर्वे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. लियाकत नार्वेकर यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत आमदार निकम यांनी अंत्रवली विभागातील पाणी प्रश्नावर त्वरित तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन दिले. व विविध विषयांवर चर्चा ही करण्यात आली. अंतरावली पाखर धरणात पाणी साठा होण्यासाठी पाटबंधारे खात्याला सूचनाही दिल्या. तसेच पावसाळा संपल्यानंतर पाझर तलावाची दुरुस्ती करून आतील पहाड दूर करून पाणी साठा कसा करता येईल यासंदर्भात पाटबंधारे खात्याचे अधीकारी भराडे यांच्याशी सविस्तर चर्चा ही केली. आणि काम त्वरित सुरू करण्याचे आदेश दिले.
www.konkantoday.com