
सह्याद्री वाहिनीवर नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच शैक्षणिक तासिकांचे आयोजन
कोरोना संसर्गामुळे राज्यात असाधारण परिस्थिती निर्माण झाल्याने विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या काळात राज्यातील शाळा बंद असल्याने या नव्या शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून डी.डी सह्याद्री वाहिनीवर नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच शैक्षणिक तासिकांचे आयोजन केले जाणार आहे.
राज्यातील इयत्ता १ ली ते १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी.डी. सह्याद्री वाहिनीवरून दिनांक १४ जून, २०२१ पासून सोमवार ते शुक्रवार या कालावधीमध्ये हे आयोजन केले जाईल. दर दिवशी ५ तास (३०० मिनिटे) इयत्तानिहाय तासिकांचे प्रक्षेपण केले जाणार आहे.
www.konkantoday.com