आजी,माजी सैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सोमवारी खेड तहसिलदार कार्यालयात बैठक

रत्नागिरी, दि. 3 : जिल्ह्यातील आजी/माजी सैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी तसेच 100 दिवसांच्या कृती आराखडा योजनेच्या अनुषंगाने तालुका पातळीवर तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली गटविकास अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत सोमवार दि. 7 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता तहसिलदार कार्यालय, खेड येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी कळविले आहे.

तरी ज्या माजी सैनिकांना काही अडी-अडचणी असल्यास आपला अर्ज व संबंधित कागदपत्रांसह या बैठकीस विहित वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button