
रत्नागिरी शहरालगतच्या नाचणे सुपलवाडी स्टॉप येथे रिक्षाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी.
रत्नागिरी शहरालगतच्या नाचणे सुपलवाडी स्टॉप येथे रिक्षाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाला. योगेश राजेश कांबळे (३२, रा. परटवणे, रत्नागिरी) असे जखमीचे नाव आहे. ही घटना ५ एप्रिल रोजी रात्री ८.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.योगेश हा ५ एप्रिल रोजी आपल्या दुचाकी (एमएच ०८ एएच ५८३५) वरून नाचणे मार्गे कुवारबाव असा जात होता. तर अक्षय सुभाष कुलये (रा. डुगवे, रत्नागिरी) हा आपल्या ताब्यातील रिक्षा (एमएच ०८ एक्यू ८३६४) घेवून काजरघाटी ते रत्नागिरी असा येत होता. शनिवारी रात्री ८.१५ वाजण्याच्या सुमारास सुपलवाडी येथे रिक्षाची योगेश याच्या ताब्यातील दुचाकीला धडक बसली. या अपघातात योगेश कांबळे हा जखमी झाला.www.konkantoday.com