
महाराष्ट्रातून मोदींच्या कॅबिनेटमध्ये मंत्रिपदासाठी भाजप खासदार नारायण राणे आणि बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांची नावे चर्चेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा जोरदार सुरु झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासोबत शुक्रवारी बैठक घेतली होती. याशिवाय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही दोन दिवस दिल्लीत तळ ठोकला होता. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातून दोन नावं मोदींच्या कॅबिनेटमध्ये मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. यामध्ये भाजप खासदार नारायण राणे यांचं आणि बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांचं नाव चर्चेत आहे
www.konkantoday.com