जिल्ह्यात सरासरी 98.69 मिमी पावसाची नोंद, रत्नागिरी तालुक्यात 193.30 मिमी,काही ठिकाणी घरांचे नुकसान तर काही ठिकाणी दरडी कोसळण्याचे प्रकार,रत्नागिरी तालुक्यात जास्त पाऊस
रत्नागिरी जिल्ह्यात कालपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी दरडी कोसळण्याचे व तर काही ठिकाणी घरांचे नुकसान होण्याचे प्रकार घडले आहेत काल रात्री पोमेंडी चांदेराई परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळत होता पोमेंडी येथून पुलावरून पाण्यातून जात असताना एक दुचाकीस्वार पाण्याबरोबर जात होता जागृत ग्रामस्थांनी त्याला वाचविले मात्र त्यांची मोटारसायकल वाहून गेली
रत्नागिरी जिल्ह्यात 24 तासात सरासरी 98.69 मिमी तर एकूण 888.20 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. मंडणगड 51.00 मिमी , दापोली 99.70 मिमी, खेड 79.80 मिमी, गुहागर 97.90 मिमी, चिपळूण 32.40 मिमी, संगमेश्वर 123.90 मिमी, रत्नागिरी 193.30 मिमी, राजापूर 114.80 मिमी,लांजा 95.40 मिमी. जिल्हा नियंत्रण कक्षाकडून 14 जुन 2021 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती पुढीलप्रमाणे आहे. संगमेश्वर तालुक्यात मौजे वायंगणी येथे दरड कोसळली. सदर ठिकाणी सा.बा.विभागाकडून दरड हटविण्याचे काम सुरु, कोणतीही जिवीत हानी नाही. मौजे कांटे येथील रस्त्यावरील मोरी खचल्याने रस्ता बंद. कोणतीही जिवीत हानी नाही. मौजे संगमेश्वर रस्त्यावर झाडे कोसळल्याने सदर रस्ता बंद होता. सदर ठिकाणी सां.बा. विभागाकडून झाडे हटविण्याचे काम सुरु. जिवीत हानी नाही. रत्नागिरी तालुक्यात मौजे उक्षी येथे 12 जुन 2021 रोजी स्वप्नाली सिध्दार्थ कांबळे यांच्या घराच्या शेजारी दरड कोसळली. सदर कुटुंबाला सुरक्षित ठिकाणी हलविले.कोणतीही जिवीत हानी नाही. मौजे पोमेंडी येथील सुरेश पवार यांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने अंशत: नुकसान झाले. कोणतीही जिवीत हानी नाही. मौजे पोमेंडी येथील (टेंभे पूल) मोटारसायकल वाहून गेली.कोणतीही जिवीत हानी नाही. लांजा तालुक्यात मौजे लांजा-वेरळ रस्त्यावर दरड कोसळल्याने सदर रस्ता बंद. सदर ठिकाणी सा.बां.विभागाकडून दरड हटविण्याचे काम सुरु. कोणतीही जिवीत हानी नाही.
www.konkantoday.com