कोविड – १९ पॉझिव्हिटी रेट कमी करणेसाठी रत्नागिरी प्रशासनाचे जोरदार प्रयत्न

आपल्या राज्यात अनलॉकडाऊनची पध्दती जाहीर झालीअसूनती ५ टप्यां मध्येराबविलीजातआहे.तथापिआपला रत्नागिरी जिल्हा४थ्याटप्प्यातसमाविष्ठ करण्यात आला आहे. सद्याच्याघडीला रत्नागिरीचा कोरोनाचापॉझिव्हिटी रेट १४.१२% इतका आहे त्यामुळे आता हे प्रमाण कमी करण्यासाठी स्थानिक प्रशासननाने दमदार पावलेटाकण्यास सुरुवात केली आहे यामध्ये खालील उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
१. जास्तीत जास्त टेस्टिंग करुन टेस्टिंगची संख्या वाढविणे, जेणेकरुन टेस्टिंगचे प्रमाण वाढले की बाधित रुग्णांचीसंख्या वाढेल पण त्यामुळे तातडीने उपचार करणे शक्य होईल. आपल्या जिल्हयात बरेचसे लोक लक्षणेजाणवल्यास दुर्लक्ष करत आहेत. त्यामळे कोरोनाचा फैलाव जास्त होतो आहे म्हणून स्वत; नागरिकांना पुढाकारघेऊन टेस्ट करुन घेणे गरजेचे आहे. जर कोणत्याही गावात किंवा शहरात कोरोनाचे लक्षण असलेले लोकटेस्टिंगसाठी तयार होत नसतील किंवा विरोध करत असतील तर पोलीस यंत्रणा, आरोग्य यंत्रणा यांचे पथक यांचेद्वारेविरोध करण्या-या लोकांवर तात्काळगुन्हेदाखलकरण्यात येतील,
२, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुयोग्य व अधिक सक्षमतेने करणे, पॉझिटिक रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांमुळे अधिक फैलाव
होणार नाही . कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनीस्वतःपुढेआलेपाहिजेस्वतःसहीतआपल्या जवळच्या लोकांनाही धोका होणार नाही. यामुळ अदृश्य केसेस समोर येतील, यामुळे होणारा फैलावआटोक्यात येईल.
३, पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना कोणत्याही परिस्थितीत संस्थात्मक विलगीकरणात ठेवणे ज्यामुळे त्यांच्याद्वारे आणखीफैलाव होणार नाही. यामध्ये ६० वर्षपेक्षा जास्त वय असणा-या जेष्ठ लोकांना संस्थात्मक विलगीकरण अनिवार्यकरण्यात आलेले आहे. लक्षणे नसलेल्या किंवा योग्य सोयी असलेल्या कोरोना पॉझिटिक रुग्णांना आणि लहान
मुल्ने असणारे पालक यासारख्या मा. जिल्हाधिकारी साहेब रत्नागिरी यांचे निर्देशनुसार एकूण ५ निकषात बसणा-यालोकांना स्टॅम्पिंग करन गृहविलगीकरणात राहता येईल. यामुळे निश्चितच फैलाव रोखण्यास मदत होईल.
मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे निर्देशानुसारमा.ग्रामविकासविभागाद्वारे ग्रामीण भागातील प्रत्येक गाकोरोना मुक्तकरण्याचीजबाबदारीजिल्हापरिषदेच्या अख्यात्यारित येणा-या सर्व ग्रामपंचायतींना दिलेले आहेत.
सहाजिकच यामध्ये ग्रामसेवकांची भूमिक मोठी असणार आहे. सर्व ग्रामपंचायतींनी कोरोनावर मात करण्यासाठी जिद्द उत्पन्न व्हावी यासाठी कोबीड -१९व्यवस्थापनासाठी कोरोनामुक्त गाव स्पर्धा योजना जाहीर करण्यात आलेली आहे.
यामध्ये ग्रामपंचायत स्तरावर ५ पथके काम करतील यात कुटूंब सव्हेक्षण, विलगीकरण कक्ष, वाहन चालक पथक,कोबीड हेल्पलाईन पथक व लसीकरण पथक याचा समावेश होतो. सदर पुरस्कार योजनेत प्रत्येक गावाने कोरोनालारोखण्यासाठी प्रोत्साहान देण्यात आलेले आहेत. सहाजिकच यामध्ये ग्रामपंचायत व ग्रामसेवकांचा सहभाग अतिशयमहत्वाचा ठरतो. जेणेकरुन प्रत्येक गाव कोरोनामुक्त होण्यासाठी मदत होईल.आपल्या जिल्हयामध्ये कोरोना पॉझिटिव्हिटी दर कमी करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक निबंधांची अंमलबजावणी
सुरु तर आहेच शिवाय विनाकारण फिरणारे किंवा मास्क न वापरणारे यांच्यावरही दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
मोकाटपणे फिरणा-यांना पोलीसांद्वारे पकडून दंडात्मक कारवाई सहीत टेस्टही करण्यात येत आहेत. एकूणच सर्व यंत्रणासमन्वय ठेवून आपल्या जिल्हयाचा कोरोना पॉझिकिटी दर कमी करण्यासाठी झपाटून कामाला लागलेल्या आहेत. याचापरिणाम म्हणून आपला पॉझिव्हिटी दर कमी होण्याची अपेक्षा आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button