संगमेश्वर तालुक्यातील ,धामणी, नावडी, म्हाबळे, कोंडगाव, साखरपा, कसबा या गावात प्रतिबंध क्षेत्र जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी जाहीर केले प्रतिबंध आदेश
संगमेश्वर तालुक्यातील धामणी ,नावडी,म्हाबळे, कोंडगाव, साखरपाआणि कसबा या गावांमधील बहुतांश वस्ती कोरोना विषाणू बाधित असल्यामुळे आणि या गावातील लोकांमुळे इतर गावांमध्ये संसर्ग वाढू शकतो .
यासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रायांनीसंगमेश्वरतालुक्यातील ,धामणी, नावडी ,म्हाबळे, कोंडगाव, साखरपा, कसबा या गावात प्रतिबंध क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे.
या गावापासून तीन किलोमीटर परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या क्षेत्रात प्रवेश करण्यास प्रतिबंध केला असून सदर चा परिसर हा कोरोनाविषाणू बाधित क्षेत्र म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला आहे
www.konkantoday.com