
रत्नागिरी शहरात मिरकरवाडा येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडुन गांजा जप्त,एका आरोपीला अटक
मा. पोलीस अधीक्षकडॉ.मोहीतकुमार गर्गयांनीस्थानिकगुन्हेअन्वेष शाखेतील अधिकारी व अंमलदारांची बैठक घेवुन अवैध धंद्यावरकारवाईकरण्याचेआदेश दिले होते त्या नुसार रत्नागिरी जिल्हयात एकुण १४ गुन्हे दाखल करुन६४,२७५/- रुपयांची अवैध दारु व मालमत्ता जप्त केली.
या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील अंमलदारांनी गोपनीय सुत्राव्दारेमाहीती घेण्यासाठी तसेच गस्तीसह अन्य पर्यायी कौशल्याने माहीती प्राप्त करण्यास सुरुवात केली
असता, दि. ११/०६/२०२१ रोजी रत्नागिरी शहर समुद्र किनारी परीसरात स्थानिक गुन्हे अन्वेषण
शाखेतील पोलीस अंमलदार गस्त करीत असता, रत्नागिरी मिरकरवाडा जुनी पोलीस चौकीसमोररोडवर पोलीस अभिलेखावरील इसम मोहंमद ताहीर इब्राहीम मस्तान याच्या ताब्यातुन २ किलो३७ ग्रॅम गांजा व अन्य असे पंचेचाळीस हजाराचे साहीत्य जप्त केले.सदरबाबत पोह. बाळू पालकर यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे दिलेल्या
तक्रारीवरुन गु.नो.क्र.२५२/२०२१, क.८(क), २०(ब), २९ एन.डी.पी.एस अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखलकरण्यात आला असुन, सदर गुन्ह्यांत मोहंमद ताहीर इब्राहीम मस्तान, रा.- वरचा मोहल्ला,मिरकरवाडा, रत्नागिरी यांस अटक करण्यात आली आहे.सदर कामगिरी केल्याबद्दल मा. पोलीस अधिक्षक डॉ. मोहीत कुमार गर्ग यांनीअभिनंदन केले आणि या पुढेही अशीच कौतुकास्पद कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन दिले.सदर कामगिरीत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोउपनि. विकास चव्हाण,पोह. सुभाष भागणे, मिलींद कदम, शांताराम झोरे, बाळू पालकर, अरुण चाळके, प्रशांत बोरकर,
पोना. अमोल भोसले, रमीज शेख यांनी सहभाग घेतला.
आत्ता पर्यंत एन.डी.पी.एस अॅक्ट अंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण
शाखेने तीन गुन्हे दाखल केले असुन, पोलीस ठाण्यांनी केलेल्या कारवाईसह जिल्ह्यात एकुण सात गुन्हे दाखल झाले आहेत.
www.konkantoday.com