
सावर्डे कॉलनी परिसरातील केदारनाथ मंदिर येथे बिबट्याची दहशत
चिपळूण तालुक्यातील सावर्डे कॉलनी परिसरातील केदारनाथ मंदिर येथे बिबट्याने दहशत निर्माण केली आहे. त्यामुळे येथील रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, याविषयी वनविभागाकडे तक्रार करण्यात आली आहे. परंतू रहिवाश्यांची
निराशा झाली असल्याचे बोलले जात आहे. या परिसरात बिबट्याचा दररोजचा वावर झाला आहे. त्याने अनेक कुत्री फस्त केली आहेत. त्यामुळे मानवी वस्तीतील हा वावर वनविभागाच्या लक्षात आणण्याचा प्रयत्न स्थानिकांनी केला. वनविभागाने मात्र योग्यवेळी पिंजरा लावू, असे सांगून लोकांनी निराशा केली आहे. येथील नागरीकांच्या जीवावर बेतल्यावर वन विभाग दक्षता घेईल का, असा प्रश्न विचारला जात आहे.www.konkantoday.com




