चांदेराई परिसरात मुसळधार पाऊस , नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ
गेल्या तीन तासांपासून चांदेराई परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे त्यामुळे नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे अद्याप पुलापर्यंत पाणी आले नसले तरी असा पाऊस कोसळत राहिला तर केव्हाही पाणी पुलावर येऊ शकते व बाजारपेठेत पाणी भरू शकते त्यामुळे बाजारपेठेतील दुकानदारानीआपल्या दुकानातील माल हलवण्यास सुरुवात केली आहे मात्र पोलीस पाटील वगळता शासकीय यंत्रणेपैकी कोणीही तिथे नसल्याचे कळते
www.konkantoday.com