ग्रामपंचायत कुवारबाव केली २०० % ते ३०० % पाणीपट्टीत प्रचंड वाढ

पाणी बिले पाहून ग्रामस्थांच्या तोंडचे पाणी पळाले ,वाढीविरोधात भाजपा लाक्षणिक उपोषण करणार असल्याचा सतेज नलावडे यांचा इशारा

कोराेनाचा महामारीमुळे व रोजगार बंद झाल्याने सर्वसामान्य माणूस आर्थिकदृष्ट्या हैराण झाले असतानाच आता रत्नागिरी शहराजवळील कुवारबाव ग्रामपंचायतीने चक्क २०० % ते ३०० % पाणीपट्टीत वाढ करून ग्रामस्थांचे कंबरडे मोडले आहे आलेली पाणी बिले पाहून ग्रामस्थांच्या तोंडचे पाणी पळाले आहे या वाढीविरोधात भाजपा लाक्षणिक उपोषण करणार असल्याचा सतेज नलावडे यांचा इशारा दिला असून याबाबत जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले आहे
ग्रामपंचायत कुवारबाव कडून प्राप्त माहितीनुसार माहे जानेवारी २०२१ च्या मासिक सभेत ठराव क्रमांक २२ सूचक – श्री सचिन कोतवडेकर व अनुमोदक सौ स्नेहल वैशंपायन यांनी मांडलेल्या ठरावानुसार एवढी वाढ केली आहे. ग्रामपंचायत पाणी विभागाचे प्रमुख लिपिक यांनी खर्चाचा दिशाभूल करणारा अहवाल सादर केला ज्यामध्ये मासिक खर्च रु २,४६,९७०ऐवजी रु ३,३५,९२७ दाखविण्यात आला व त्याच आधारे हि अति प्रचंड वाढ करणेत आली. त्यामुळे ज्या ग्राहकाला पूर्वी पाण्याचे बिल रु ४०० येत होते ते आता पाणी बिल ११०० रुपयांवर पोचले आहे.युनिट मागे ४ ते ५ रुपये प्रति युनिट वाढ समजण्यायोग्य होती परंतु प्रति युनिट ४०/-वाढ म्हणजे ग्रामस्थांचे कंबरडेच मोडण्यासारखे आहे .
या वाढी विरोधात सर्व ग्रामस्थ एकवटले असून हि भाववाढ करण्याअगोदर ग्रामसभेला, पाणी कामिटीलाही विचारात घेण्यात आले नाही. या साठी ग्रामपंचायतीने ग्रामस्थांकडून हरकती मागविल्या होत्या, पण त्यांच्याहि हरकती विचारात घेतल्या नाहीत.
या अन्यायकारक पाणीपट्टी वाढी विरोधात सदस्य श्री. गौरव पावसकर , सौ. अनुश्री आपटे, श्री. गणेश मांडवकर व प्राजक्ता चाळके (सौ.नेहा अपकरे) यांनी पत्र दिले आहे. मा. सरपंच मंजिरी पाडळकर यांनीही आपणही या विरोधात टिपणी लिहिली असून बहुमतामुळे तो अमलात आणावा लागत असल्याचे सांगितले, सरपंच यांनी गटविकास अधिकारी यांचे मार्गदर्शन मागविले असता, ग्रामपंचायतीने मागवलेल्या ग्रामस्थांच्या हरकती विचारात न घेता, ग्रामसभा व पाणि समिति सभा न बोलावता आपण एवढी भाववाढ करू शकता असे उत्तर दिले आहे, त्यामुळे गटविकास अधिकारी यांचे मार्गदर्शन चुकीचे असल्यास त्यांचेवरही कारवाई करावी.
वास्तविक नळपाणी योजने साठी सौरऊर्जा योजना बसवून झाली असून ती कार्यान्वित झाल्यावर महिना ५० ते ६० हजार रुपये वाचणार आहेत ,असे असूनही भाव वाढ का करणेत आली आहे ? हे अनाकलनीय आहे. या सौरउर्जा योजने बरोबरच मा.बशीरभाई मुर्तुझा (प्रांतिक सदस्य राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी) यांचे प्रयत्नाने माननीय ग्रामविकास मंत्री हसनजी मुश्रीफ साहेब यांनीही १ कोटी ४२ लाख गावातिल तळ्यावर पूरक पाणि योजनेसाठी मंजूर केले आहेत. त्यामुळे महिना १० ते १२ हजार रुपये वाचणार आहेत.
ग्रामपंचायतमधील तीन पाणी योजना कर्मचाऱ्यांचा पगार रुपये ७५०००/-प्रती महा दाखवण्यात आला आहे आणि वर्षाला तो शासनाच्या निकषाचे उल्लंघन करणारा आहे. हि वाढ घाईघाईने लोकांना विचारात न घेता करण्यात आली आहे या विरोधात कायदेशीर मार्गाने उपोषणास बसणार असल्याचे श्री. सतेज नलावडे, श्री दीपक आपटे, श्री नितीश अपकरे, श्री अभिजित पाडळकर, ग्रामपंचायत सदस्य व जेष्ठ नागरिक यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. ग्रामस्थांना विश्वासात न घेता व सभेत मंजुरी न घेता ग्रामपंचायतीने केलेली ही प्रचंड दरवाढ तातडीने मागे घ्यावी अशी कुवारबाव परिसरातील नळधारक ग्रामस्थांची मागणी आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button