
रत्नागिरी जिल्हा अजुनही चौथ्या टप्प्यात राहणार,रत्नागिरी जिल्ह्याचा पॉजिटिव्ह रेट १४.१२
राज्य सरकारने जाहीर केलेल्या टप्प्यांनुसार जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेडपैकी रुग्ण असलेल्या बेडचं प्रमाण या आधारावर जिल्ह्यांची विभागणी ५ गटांमध्ये करण्यात आली आहे. दर गुरुवारी यासंदर्भात आढाव घेण्याचा निर्णय घेण्यात आला. आजच्या आकडेवारीनुसार स्थानिक जिल्हा प्रशासन आपला जिल्हा किंवा त्यातील महानगर पालिका कोणत्या गटात नव्याने वर्ग करता येतील, किंवा आहे त्याच गटात कायम राहतील किंवा आहे त्याच गटात कायम ठेऊन निर्बंध कठोर होतील, याविषयीचा निर्णय घेईल. नव्याने घेण्यात आलेले निर्णय ठरल्याप्रमाणे १४ जूनपासून म्हणजेच सोमवारपासून त्या त्या जिल्ह्यात किंवा महानगर पालिका क्षेत्रामध्ये लागू करण्यात येतील.रत्नागिरी जिल्हा अजुनही शासनाच्या निकषाप्रमाणे चौथ्या टप्प्यातच आहे
जिल्हानिहाय पॉझिटिव्हिटी रेट (१० जून)
अहमदनगर – २.६३
अकोला – ५.३७
अमरावती – ४.३६
औरंगाबाद – ५.३५
बीड – ५.२२
भंडारा – १.२२
बुलढाणा – २.३७
चंद्रपूर – ०.८७
धुळे – १.६
गडचिरोली – ५.५५
गोंदिया – ०.८३
हिंगोली – १.२०
जळगाव – १.८२
जालना – १.४४
कोल्हापूर – १५.८५
लातूर – २.४३
मुंबई शहर आणि उपनगर – ४.४०
नागपूर – ३.१३
नांदेड – १.१९
नंदुरबार – २.०६
नाशिक – ७.१२
उस्मानाबाद – ५.१६
पालघर – ४.४३
परभणी – २.३०
पुणे – ११.११
रायगड – १३.३३
रत्नागिरी – १४.१२
सांगली – ६.८९
सातारा – ११.३०
सिंधुदुर्ग – ११.८९
सोलापूर – ३.४३
ठाणे – ५.९२
वर्धा – २.०५
वाशिम – २.२५
यवतमाळ – २.९
त्यानुसार देखील जिल्ह्यांची वर्गवारी कोणत्या टप्प्यात करायची किंवा कोणते निर्बंध जिल्ह्यात लागू करायचे, याचा निर्णय स्थानिक प्रशासन घेणार आहे.
ऑक्सिजन बेडची स्थिती
जिल्ह्यांमधील ऑक्सिजन बेडच्या उपलब्धतेनुसार सर्वाधिक भरलेले ऑक्सिजन बेड देखील पॉझिटिव्हिटी रेटनुसार कोल्हापूरमध्ये आहेत.
कोल्हापूरमध्ये गुरुवारच्या आकडेवारीनुसार ६७.४१ टक्के ऑक्सिजन बेड भरलेले आहेत. त्यापाठोपाठ सिधुदुर्गमध्ये ५१.५९ टक्के बेड, रत्नागिरीमध्ये ४८.७५ टक्के तर साताऱ्यामध्ये ४१.०६ टक्के बेड भरलेले आहेत.
त्यामुळे शासनाच्या निकषाप्रमाणे रत्नागिरी जिल्हा सध्या तरी चौथ्या टप्प्यात असून त्यामुळे सध्या सुरू असलेले निर्बंध कायम राहणार आहेत जर जिल्हा तिसर्या टप्प्यात आला असता तर निर्बंधांत आणखी शिथिलता मिळाली असती
www.konkantoday.com