प्रत्येक छोट्या घटकांचा विचार कोणताही निर्णय घेताना झाला पाहिजे अन्यथा उपासमारीची वेळ येणार -रत्नागिरीचे हॉटेल व्यावसायिक अजय गांधी
आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासन यांचे नियोजन नसल्यामुळे कोरोना चा प्रादुर्भाव वाढला आहे.
बाजारपेठ बंद असताना दोन महिन्यात कोरोना नियंत्रणात का आला नाही ? हा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. लॉकडाऊन मुळे सर्वसामान्य व्यापारी भरडला जातोय, व्यापाऱ्यांचा विचार कोणीही करताना दिसत नाही आहे, आणि होम डिलिव्हरी मोठ्या हॉटेल व्यवसायिक देऊ शकतात मात्र छोट्या व्यावसायिकांकडे शासनाने लक्ष दिलेले नाही त्यांच्यावर आज उपासमारीची वेळ आली आहे.
कर्जाचे हप्ते भरणार कुठून या प्रश्नाचा जराही विचार शासनाने केलेला नाही दुकाने हॉटेल बंद असताना महावितरणची बिले नेहमीपेक्षा जास्त आली आहेत, हे सरकारला दिसत नाही का ? प्रत्येक छोट्या घटकांचा विचार कोणताही निर्णय घेताना झाला पाहिजे अन्यथा उपासमारीची वेळ येणार हे निश्चित असून छोट्या व्यापारी वर्गाला आत्महत्येशिवाय दुसरा मार्ग उरणार नाही.
तेव्हा लोकप्रतिनिधी, नेतेमंडळी आणि शासन प्रशासनाने या गोष्टींचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे, नाहीतर कोरोना महामारी पेक्षा कर्ज वीज बिले भाडी नोकरांचे पगार हे भागवणे या परिस्थितीत आवाक्याच्या बाहेर असल्याने छोट्या व्यापारी वर्गाला जीव देण्याशिवाय अन्य पर्याय राहणार नाही या शब्दात हॉटेल व्यवसायिक अजय गांधी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे
www.konkantoday.com