
तुम्ही सर्व कर्मचारी आहात म्हणूनच जिल्ह्यातील कोरोना रुग्णांवर वेळेत उपचार होत आहेत. त्यामुळे आम्ही सर्व लोकप्रतिनिधी तुमच्या पाठीशी आहोत.- मंत्री उदय सामंत
रत्नागिरी दौर्यावर आलेल्या मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीतील उद्यमनगर येथील कोव्हिड हॉस्पिटलला शुक्रवारी भेट दिली. उद्यमनगर येथील कोव्हिड हॉस्पिटलमधील डॉक्टर, परिचारिका आदी कर्मचा-यांनी सोशल मिडियावर बदनामी सुरु असल्याकारणाने काम बंदचा ईशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर या कर्मचा-यांची समजूत काढण्यासाठी व आवश्यक त्या सुचना करण्यासाठी मंत्री उदय सामंत यांनी कोव्हिड हॉस्पिटलला भेट दिली. कोव्हिड हॉस्पिटलमध्ये पाणी नसते. त्यामुळे रुग्णांची हेळसांड होत असते. तसेच येथील कर्मचा-यांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रुग्णांचे नातेवाईक कोव्हिड पॉझिटीव्ह रुग्णांना भेटण्याचा हट्ट करत असतात. रुग्णांना भेटण्यासाठी नातेवाईक पर्यायी मार्गाचा अवलंब करतात. त्यामुळे नातेवाईकांमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा अनेक समस्या मंत्री उदय सामंत यांनी जाणून घेतल्या. यावेळी मंत्री उदय सामंत म्हणाले की तुम्ही सर्व कर्मचारी आहात म्हणूनच जिल्ह्यातील कोरोना रुग्णांवर वेळेत उपचार होत आहेत. त्यामुळे आम्ही सर्व लोकप्रतिनिधी तुमच्या पाठीशी आहोत. सोशल मिडियावर काय व्हायरल होतय त्याकडे दुर्लक्ष करावे. आणि आपले कोव्हिड हॉस्पिटलचा राज्यातील चांगले कोव्हिड हॉस्पिटल म्हणून गौरव झाला पाहिजे असे काम करावे. अधिका-यांनी देखील येथील समस्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशा सुचना मंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिल्या. यावेळी आमदार राजन साळवी, नगराध्यक्ष प्रदिप उर्फ बंड्या साळवी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बबिता कमलापूरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संघमित्रा गावडे-फूले आदी उपस्थीत होते.
www.konkantoday.com