
खेड तालुक्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला वेग; उद्दीष्ट पुर्ण करण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाचे प्रयत्न
खेड : खेड तालुक्यातील ७ प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधक कोव्हक्सिन आणि कोविशिल्ड लसीकरण मोहिमेला वेग आला असून आतापर्यंत तालुक्यात ५५६९ जणांनी कोव्हक्सिनचा तर २२६७९ जणांनी कोविशिल्डचा पहिला डोस घेतला आहे. कोव्हक्सिनचा दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ३५७९ तर कोव्हिशिल्ड लसीचा डोस घेणाऱ्यांची संख्या १३०५ इतकी आहे.
खेड तालुक्यात तळे, कोरेगाव, फुरुस, आंबवली, वावे, लोटे, शिव, तिसंगी, हे सात प्राथमिक आरोग्य केंद्र तर खेड नगरपालिका, आवाशी, कळंबी, जामगे. घरडा, पोसरे, सात्विनगाव लवेल आणि खेड शहरातील सहजिवन विद्यालय या केंद्रावर लसीकरण सुरु आहे. सुरवातीला लसीकरणाला तितकासा प्रतिसाद नव्हता मात्र आता लस घेण्यासाठी नागरिक गर्दी करू लागले आहेत. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार तळे प्राथमिक आरोग्य केंद्रात ६०५ जणांनी कोवॅक्शिन लसीचा पहिला डोस तर १८२२ जणांनी कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतला आहे. याच प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत ३१७ जणांना कोवॅक्शिनचा डोस तर २१५ जणांना कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.,
कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आतापर्यंत ५५६८ जणांनी कोवॅक्शिन लसीचा पहिला तर ३४८ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. १७५५ जणांनी कोविशिल्डचा पहिला डोस तर ३४९ जणांना दसरा डोस देण्यात आला आहे. फुरुस प्राथमिक आरोग्य केंद्रात कोवॅक्शिन चा पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या ५३६ तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ३२० आहे. कोविशिल्डचा पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या १६७६ तर ३२७ जणांनी दुसरा डोस घेतला आहे.
फेब्रुवारी महिन्यात कोरोनाच विस्फोट झालेल्या आंबवली भागात आतापर्यंत कोवॅक्शिनचा पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या ४६२ तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ३०० आहे. १७७६ जणांनी कोविशिल्डचा पहिला तर ५० जणांनी दुसरा डोस घेतला आहे. वावे प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गत ४१८ जणांनी कोक्शिनचा पहिला तर २५४ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. याच प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या १७४० तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या १६८ आहे.शिव प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गत आतापर्यंत कोवॅक्शिनचा लसीचा पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या ५१५ तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ३२३ आहे.
कोविशिल्ड लस घेणाऱ्यांची संख्या १७९२ तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या २९६ आहे. तिसंगी प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गत असलेल्या लसीकरण केंद्रातून कोवॅक्शिन लसीचा पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या ३८३ तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या १८० आहे तर कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या २०७८ तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ९५८ इतकी आहे. कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात आतापर्यंत २३९ जणांनी कोवॅक्शिन लसीचा पहिला तर ६० जणांनी दुसरा डोस घेतला आहे. याच लसीकरण केंद्रात २०७८ जणांनी कोविशिल्ड लसीचा पहिला तर ९५२ जणांनी दुसरा डोस घेतला आहे.खेड नगरपालिका रुग्णालय लसिकरण केंद्रात आतापर्यंत ४४३ जणांनी कोक्शिन लसीचा पहिला तर ८७९ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तर ४१९१ जणांनी कोविशिल्ड लसीचा पहिला तर ६६ जण दुसरा डोस घेतला आहे. लसीकरणाचे उद्दिष्ट पुर्ण करण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाचे प्रयत्न सुरु असल्याचे तालुका वैद्यकिय अधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले.
www.konkantoday.com