
महिला कोव्हिड रूग्णालय व बीएड काेविड सेंटर येथे पाण्याचे टँकर पुरविण्याचा भाजप जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांचा निर्णय
रत्नागिरी शहरातील महिला कोव्हिडं रुग्णालय व बीएड कोव्हिडं सेन्टर येथे पाणी प्रश्न निर्माण झाला हाेता तेथे उपचार घेत असलेल्या रुग्णांना . पाणी टंचाई जाणवत होती हे लक्षात येताच भाजपचे जिल्हाध्यक्ष अँड . दीपक पटवर्धन यांनी प्रशासनाशी संपर्क केला व तातडीने दोन्ही ठिकाणी पाणी टँकर(पिण्या व्यतिरिक्त उपयोगा साठी) रवाना केला दररोज १३००० लिटर पाणी आपण पुरवणार असल्याचे त्यानी सांगितले स्थानिक प्रशासनाने या कडे लक्ष देणे गरजेचे होते हे खरं असलं तरी आपली सामाजिक जबाबदारी समजून ही तातडीची व्यवस्था केली असे दीपक पटवर्धन भाजपा जिल्हा अध्यक्ष यांनी सांगितले.
www.konkantoday.com