
जिल्हा रुग्णालयातील वॉर्डबॉयना सहा महिने वेतनच नाही
रत्नागिरी : कोरोना काळात स्वत:चा जीव धोक्यात घालून महिला व जिल्हा रुग्णालयात सेवा बजाविणार्या वॉर्डबॉयना तब्बल सहा महिन्यांचे वेतन देण्यात आले नसल्याचे उघड झाले आहे. कोरोना काळात वार्डबॉय म्हणून हे तरूण सेवेत आले खरे, मात्र, आता वेतनासाठी त्यांची परवड होत आहे. ऑक्टोबर 2021 पासून वेतनच न झाल्याने त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना काळात आरोग्य विभागाकडे अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने कंत्राटी कर्मचार्यांची भरती करण्यात आली. प्रतिदिन 400 रु.प्रमाणे वेतनाच्या अटींवर भरती करण्यात आली. वार्डबॉयचे करार मुदत संपल्याने नवीन पेमेंट मिळाले नाही, कोरोना काळापुरते या कर्मचार्यांना घेण्यात आले होते. त्यामुळे या सहा महिन्यांपासून पगार झालेला नाही, सीएसआरमध्ये निधी नसल्याने पगार देता आला नाही. मात्र, या कर्मचार्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी कोरोना ईसीअॅडमधून पैसे देण्यासाठी आपण शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांचे म्हणणे आहे.