
पोलिससांसाठी दोन लाख घरे निर्माण करण्याचे उद्दिष्ट -नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे
राज्यतील पोलिसांच्या घरांचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागून निवृत्तीनंतर त्यांची घरासाठीची वणवण थांबावी म्हणून नगरविकास विभागाच्यावतीने विशेष धोरण तयार करण्यात येत असल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. या धोरणाच्या माध्यमातून पोलिससांसाठी दोन लाख घरे निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी गृह आणि गृहनिर्माण विभागाच्या समन्वयाने धोरण तयार करण्यात येत असून त्याला लवकरच अंतिम स्वरूप देऊन ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडले जाईल, असेही शिंदे यांनी सांगितले
www.konkantoday.com