
तर वाघाच्या मिशीला हात लावून दाखवा -शिवसेना नेते संजय राऊत यांचे चंद्रकांत पाटील यांना आव्हान
शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील शाब्दिक चकमकी अजूनही सुरूच आहेत. आजही संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांवर खोचक टीका केली. शिवसेना हा पिंजऱ्यातला वाघ आहे, असं चंद्रकांतदादा म्हणत आहे. त्यांना तसं वाटत असेल तर मी त्यांना पिंजऱ्यात येण्याचं आमंत्रण देतो, असं सांगतानाच हिंमत असेल तर वाघाच्या मिशीला हात लावून दाखवा, असं आव्हानच संजय राऊत यांनी भाजपला दिलं आहे.
www.konkantoday.com