
२०२४ पर्यंत राष्ट्रवादी पक्ष अधिक भक्कम होईल आणि जास्त लोक निवडून येतील-प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील
महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला १० जून रोजी २२ वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एका मुलाखतीत आघाडी सरकार आणि इतर मुद्द्यांवर पक्षाची भूमिका मांडली. “आमचा मित्रपक्ष काँग्रेस होता, आहे आणि राहिल. मात्र, आता एक नवीन मित्रपक्ष मिळाला आहे, भविष्यात देखील तीन पक्षाचे सरकार राहावे,” असं सांगत २०२४ पर्यंत राष्ट्रवादी पक्ष अधिक भक्कम होईल आणि जास्त लोक निवडून येतील,” असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
www.konkantoday.com