
संगमेश्वर परिसरातील दोन मनोरुग्णांना राजरत्न प्रतिष्ठानने मनोरुग्णालयात भरती केले
उन , वारा , पाऊस आणि थंडी या कशाचीही तमा न बाळगता गेली सहा वर्षे संगमेश्वर आणि माभळे परिसरात महामार्गाच्या बाजूला असणारा कचरा एकत्र करुन परिसराची स्वच्छता करणाऱ्या एका वयोवृध्द मनोरुग्णाला आणि महामार्गावर टाकल्या जाणाऱ्या रिकाम्या पाण्याच्या बाटल्या गोळा करुन जणू ‘पर्यावरण वाचवा’ असा संदेश देणाऱ्या मनोरुग्ण महिलेला रत्नागिरी येथील राजरत्न प्रतिष्ठानने संगमेश्वर येथे येवून ताब्यात घेतले आणि त्यांना मायेचा हात देत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन मनोरुग्णालयात भरती केले. राजरत्नच्या या कामगिरीबद्दल संगमेश्वरवासीयांनी त्यांना धन्यवाद दिले आहेत
www.konkantoday.com