
ऐन पावसातील नगरपरिषदेच्या पाणीयोजनेच्या कामामुळे नागरिकांना करावी लागत आहे कसरत
सध्या रत्नागिरी नगरपरिषद मार्फत नवीन पाईपलाईन टाकण्यात येत आहे.लाॅकडाॅऊनच्या काळात पाण्याची नवीन पाईप लाईन रत्नागिरी शहर बस स्थानका समोर टाकण्यात येत आहे त्याचा मुहूर्त पावसाळ्यामध्ये काढण्यात आला गेल्या दोन दिवसापासून सतत मुसळधार पाऊस होत असल्यामुळे पाईपलाईन टाकली आहे त्या रस्त्यावर संपूर्ण भागांमध्ये चिखलाचं साम्राज्य दिसून येते आहे रत्नागिरी नगर परिषदेकडून आज चर खडी भरून बुजविण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र आता लाॅकडाॅऊन उठल्यानंतर नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे तसेच रहदारी वाढली आहे त्यामुळे सध्या तरी चिखला मधूनच कसरत करत नागरिकांना या रस्त्यावरून ये जा करावी लागत आहे
www.konkantoday.com