
लाॅकडाऊनच्या कालावधीत रत्नागिरी जिह्यातील १५० कलाध्यापकांनी ७००पेक्षा अधिक कलाकृती साकारल्या
रत्नागिरी जिह्यातील कलाध्यापकांनी लॉकडाऊनच्या कालावधीत स्वत:ला कॅनव्हास आणि रंगांच्या दुनियेत गुंतवून घेतले आहे. यामुळे जिह्यातील १५० कलाध्यापकांनी ७००पेक्षा अधिक कलाकृती साकारल्या आहेत. एवढेच नव्हे तर या सर्व कलापृती सर्वांना पहाता याव्यात यासाठी नुकतेच एक यू-टय़ूब चॅनेलही सुरू केले आहे.
मुळात या अभिनव प्रयोगाची सुरुवात चार महिन्यांपूर्वी झाली होती. जिह्यातील कलाध्यापकांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर प्रत्येक कलाध्यापकाने दररोज किमान एक कलाकृती चितारण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळाला. कलाध्यापकांनी तीन-चार कलाकृती काढल्या. आठवडय़ाला सर्वाधिक कलाकृती साकारणाऱया कलाध्यापकाचा प्रमाणपत्र देऊन जिल्हा कलाध्यापक संघटनेच्यावतीने गौरव केला जाऊ लागला.यामुळे कलाकारांना नवी ऊर्जा मिळाली आणि चार महिन्यांच्या कालावधीत जवळपास ७००कलाकृती चितारल्या गेल्या. कला शिक्षकांचा कुंचला यामुळे सतत हलता राहिला आणि जिह्यात कलाकृती साकारण्याचा एक नवा विक्रमही घडला. या सर्व कलाकृती रसिकांना पहाता याव्यात यासाठी कलाशिक्षक इम्तियाज शेख यांनी यू-टय़ूब चॅनेल सुरू केले आहे
www.konkantoday.com