
प्रादेशिक परिवहन प्राधिकरण रत्नागिरीने रुग्णवाहिकांचे भाडेदर निश्चित केले ,भाडेदर रुग्णवाहिकेच्या आतील बाजूस प्रदर्शित करणे व भाडेपावती देणे बंधनकारक
गेले काही दिवस रुग्णवाहिकेच्या वाढीव दराबाबत वाद निर्माण झाला असतानाच आता प्रादेशिक परिवहन प्राधिकरण रत्नागिरीने रुग्णवाहिकांचे भाडेदर निश्चित केले आहेत.रुग्णवाहिकांचे निश्चित केलेले भाडेदर रुग्णवाहिकेच्या आतील बाजूस प्रदर्शित करणे व भाडेपावती देणे चालक मालक यांना बंधनकारक राहील. रुग्णवाहिकांच्या भाडेदरामध्ये चालकांचा पगार व इंधनाचा खर्च समाविष्ट करण्यात आलेला आहे़. रुग्णवाहिका कार्यक्षम, स्वच्छ व निर्जंतुक ठेवण्याची जबाबदारी वाहनचालक व मालकाची असेल. रुग्णवाहिकेच्या तांत्रिक दोषाकंरीता वाहनचालक व मालक जबाबदार असेल
भाडेदर पुढीलप्रमाणे आहेत. हे भाडेदर 25 किमी अंतर किंवा 2 तासांकरीता ठरवण्यात आले आहेत.
मारुतीव्हॅनसाठी भाडेदर 700 रुपये 25 किमी करीता व 14 रुपये प्रति किमी, रुग्णवाहिकांची स्वच्छता व निर्जंतुकीकरण दर 500 रुपये, वाहनचालक पीपीई कीट दर 500 रुपये आकारण्यात येणार आहे.टाटा सुमो व मॅटॅडोरसदृ कंपनीने बांधणी केलेल्या वाहनांसाठी भाडेदर 840 रुपये 25 किमी करीता व 14 रुपये प्रति किमी, रुग्णवाहिकांची स्वच्छता व निर्जंतुकीकरण दर 700 रुपये, वाहनचालक पीपीई कीट दर 500 रुपये आकारण्यात येणार आहे. टाटा 407 स्वराज माझदा आदीच्या साठ्यावर बांधणी केलेल्या वाहनांसाठी भाडेदर 980 रुपये 25 किमी करीता व 20 रुपये प्रति किमी, रुग्णवाहिकांची स्वच्छता व निर्जंतुकीकरण दर 1000 रुपये, वाहनचालक पीपीई कीट दर 500 रुपये आकारण्यात येणार आहे़. आयसीयु अथवा वातानुकुलीत वाहनांसाठी भाडेदर 1190 रुपये 25 किमी करीता व 24 रुपये प्रति किमी, रुग्णवाहिकांची स्वच्छता व निर्जंतुकीकरण दर 1000 रुपये, वाहनचालक पीपीई कीट दर 500 रुपये आकारण्यात येणार आहे़. प्राधिकरणाने निश्चित केलेल्या भाडेदरापेक्षा जास्त भाडेदर आकारल्यास अशा वाहन चालक, मालकांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत कार्यवाही करण्याचा इशारा देण्यात आला आहे़.
www.konkantoday.com