
निर्बंध पाळून बाजारपेठा व दुकाने उघडण्याबाबत परवानगी मिळण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील व्यापारीआक्रमक ,अनेक लोकप्रतिनिधींकडून लाॅकडाऊन उठवण्याची मागणी
रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने लावलेल्या लाॅकडाऊन मुदत आज रात्री संपणार आहे रत्नागिरी जिल्ह्यात लॉकडाऊन लागण्याच्या आगोदर शासनाने बंधने घातल्याने अनेक दुकाने दोन महिने बंद आहेत त्यामुळे आम्हाला निर्बंध पाळून दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी या मागणीसाठी जिल्ह्यातील व्यापारी आक्रमक झाले आहेत यापुढे आम्ही लॉकडाऊन सहन करणार नाही अशी भूमिकाही त्यांनी घेतली आहे रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाच्यावतीने देखील निर्बंध पाळुन दुकाने उघडण्यास परवानगी मिळावी असे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून निर्बंध पाळून दुकाने उघडण्याची परवानगी देण्यासाठी मागणी केली आहे आमदार राजन साळवी यांनी देखील व्यापाऱ्यांची बाजू घेत लॉकडाऊन उठविण्याची व निर्बंध पाळून व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केली आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या दौर्यावर आलेले खासदार विनायक राऊत यांनी काल दुपारी जाहीर केलेली जिल्ह्यातील कराेनाला अटकाव करायचा असेल तर कडक लॉकडाऊन हवा ही आपली दुपारची भूमिका बदलून कडक लॉकडाऊन लावण्याचे दिवस गेले अशी नवी भूमिका संध्याकाळी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळांसोबत घेतली खासदारांच्या या भूमिकेचे व्यापाऱ्यांनी स्वागत केले आहे शासनाच्या नवीन नियमावलीप्रमाणे चौथ्या टप्प्यात असलेल्या रायगड सिंधुदुर्ग कोल्हापूर आदी जिल्ह्यांतील अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू झाली आहेत मात्र रत्नागिरी प्रशासनाने घातलेल्या लॉकडाऊनमुळे रत्नागिरीत ही दुकाने सुरू होऊ शकली नव्हती आता प्रशासनावरदेखील व्यापाऱ्यांबरोबरच लोकप्रतिनिधींकडून बाजारपेठा सुरू करण्याबाबत दबाव वाढत आहे त्यातच रत्नागिरी जिल्ह्यात ११जून राेजी ढगफुटी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवल्यामुळे त्यामुळे त्या दिवशी जिल्हा प्रशासन संचारबंदी लावण्याच्या विचारात आहे त्यामुळे आज लॉकडाऊन संपल्यानंतर व्यापाऱ्यांच्या बाबतीत प्रशासनाची भूमिका नेमकी काय राहणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहेउच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत देखील रत्नागिरी दौर्यावर येत आहेत कडक लॉक डाऊन लावण्याअगोदर व्यापारी ,प्रशासन व मंत्रिमहोदय यांच्यात झालेल्या बैठकीत लाॅकडाऊन उठल्यानंतर व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय केला जाईल असे ठरवण्यात आले होते त्यामुळे इतके दिवस प्रशासनाला सहकार्य करणार्या व्यापारी वर्गाला निर्बंध लावून सर्व दुकाने उघडण्यास परवानगी मिळेल अशी आशा आहे मात्र प्रशासनाने उद्यापासून परवानगी दिली तरी रत्नागिरी जिल्हा हा चौथ्या टप्प्यात असल्याने सर्व दुकाने उघडण्यास परवानगी मिळणार की अत्यावश्यक सेवा व अन्य शासनाने परवानगी दिलेल्या दुकानाना परवानगी मिळणार हा प्रश्न आहे सध्या रत्नागिरी जिल्हा चौथ्या टप्प्यात आहे रत्नागिरी जिल्हा तिसर्या टप्प्यात आला तर शासनाच्या नियमावलीप्रमाणे सर्व दुकाने शासनाने ठरवून दिलेल्या वेळेत उघडण्यास परवानगी मिळू शकते
दर शुक्रवारी ऑक्सिजन बेड व रुग्णांची संख्या याच्या आधारे संबंधित विभागाकडून पडताळणी करून आठवडाभरासाठी जिल्ह्याचा टप्पा ठरवण्यात येतो त्यामुळे जिल्ह्यातील सर्व दुकाने उघडण्याबाबत प्रशासन उद्या गुरुवारी नेमकी कोणती भूमिका घेणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही जिल्हा प्रशासन व खासदार व आमदार राजन साळवी आदींची व व्यापारी संघटनांची आज एक बैठक होणार असल्याचे कळते नामदार उदय सामंत यांनी व्यापाऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन व्यापाऱ्यांना निर्बंध पाळून सरसकट दुकाने उघडण्यासाठी परवानगी मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी जिल्ह्यातील व्यापाऱ्यांची मागणी आहे
www.konkantoday.com