
एका अपघातात त्यांना आपला एक पाय गमवावा लागला़ त्याही परिस्थितीत त्यांनी स्वतःला सावरले़,झाडावर चढण्याच्या कलेने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवला
एका अपघातात श्रीपत याना आपला एक पाय गमवावा लागला़ त्याही परिस्थितीत त्यांनी स्वतःला सावरले़ एका पायावर स्वतःचा तोल सावरत ते जेव्हा पटापट माडावर चढतात याच कष्टावर ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. हा कल्पवृक्षच त्यांना जगण्याचा मार्ग दाखवत आहे आणि त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण करत आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.संगमेश्वर तालुक्यातील निसर्गसौंदर्य लाभलेल्या तुरळ गावातील श्रीपत जवरत यांनी झाडावर चढण्याच्या कलेला जोपासतच त्यातून आपल्या व्यवसायाचा मेळ घातला आहेएक पाय गमवावा लागला तरी त्याच झाडावर चढण्याच्या कलेने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवला आहे. गावात तसेच आजूबाजूच्या परिसरातील मंडळीही त्यांना नारळ काढण्यासाठी आवर्जून बोलवतात.श्रीपत एका पायाच्या जोरावर उंच झाडांवर पटापट चढतात. मग ते झाड कोणतेही असो. एकाच पायाच्या सहाय्याने नारळी साफ करुन हा अवलिया आपल्या कुटुंबाला सांभाळतो. जिद्द, चिकाटी आणि मेहनत याच्या जोरावर श्रीपत यांनी समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे.
www.konkantoday.com