खासदार विनायकजी राऊत व आमदार डॉ.राजनजी साळवी ह्यांचे आवाहनाला प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद
काल खासदार विनायकजी राऊत व आमदार डॉ.राजनजी साळवी ह्यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्राह्यांना लॉकडाऊ बाबत शिथिलता देऊन काही निर्बंधासह दुकाने उघडी करण्यास मुभा द्यावी असे आवाहनकेले होते. आज रत्नागिरी शासकीय विश्रामगृह येथे शिवसेना सचिव, शिवसेना लोकसभा गटनेते, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार विनायकजी राऊत व *राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ.राजनजी साळवी ह्यांची जिल्ह्यातील व्यापारी संघटनेच्या तालुका अध्यक्ष व प्रतिनिधी ह्यांनी भेट घेऊन लॉकडाऊन च्या पार्श्वभूमीवर मागील दोन महिन्यांपासून सर्व दुकाने बंद होती. यामुळे व्यापारीवर्ग मेटाकुटीला आला होता. १० जून पासून आम्ही दुकाने उघडणार या मागणीवर जिल्ह्यातील व्यापारी ठाम होते. तशी मागणी देखील व्यापाऱ्यांच्या संघटनांनी प्रशासनाकडे केली होती. परंतु प्रशासनाकडून कोणताच प्रतिसाद नसल्यामुळे या पेचातुन मार्ग काढण्याची विनंती केली. त्यानुसार आज उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत*यांच्या सूचनेनुसार *जिल्हाधिकारी कार्यालयात*एक बैठक पार पडली. या बैठकीला *खासदार विनायकजी राऊत, आमदार डॉ. राजन साळवी, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, उद्योजक किरणशेठ सामंत, नगराध्यक्ष बंड्या साळवी व जिल्ह्यातील व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. रत्नागिरी जिल्हा चौथ्या टप्प्यात येतो. या टप्प्याच्या निकषानुसार सुमारे ७०% आस्थापना सुरू होणार असून फक्त सोनार व कापड व्यापारी बंद राहणार आहेत. याबाबत नवीन आदेश लवकरच जारी होणार असून या आदेशा नंतर याबाबत शिथिलता मिळण्याची शक्यता आहे. त्याप्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने, जिल्हाप्रमुख विलास चाळके, निवासी जिल्हाधिकारी दत्ता भडकवार, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, गणेश भिंगार्डे, निखिल देसाई, हेमंत वणजू, सौरभ मलूष्टे, अमोल डोंगरे, अरुण भोजने, शिरीष काटकर, बाबा सावंत, किशोर रेडीज, प्रसन्ना शेट्ये, उदय ओतरी, प्रभाकर शेट्ये, कुमार बेंडखळे, उल्हास नलावडे, संजय पटेल, राजू जागुष्ठे, संदीप मालपेकर व जिल्ह्यातील व्यापारी वर्ग उपस्थिती होते,
www.konkantoday.com