कोरोना रोखण्यासाठीचं ‘मुंबई मॉडल’ दिल्लीत राबवणार
मुंबई महापालिकेने कोरोना रोखण्यासाठी केलेल्या कामांची सर्वोच्च न्यायालयानेही दखल घेतली होती. मुंबईच मॉडलचा अभ्यास का करत नाही?, असा सवालही कोर्टाने दिल्ली सरकारला केला होता. त्यानंतर दिल्ली सरकारचं एक प्रतिनिधी मंडळ मुंबईत आलं होतं. या प्रतिनिधी मंडळाने मुंबईतील ‘वॉर्ड वॉर रुम’, जम्बो रुग्णालयांची पाहणी केली. तसेच सेव्हन हिल्स रुग्णालयात जाऊन व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी कोरोना रोखण्यासाठीचं ‘मुंबई मॉडल’ दिल्लीत राबवणार असल्याचं या प्रतिनिधी मंडळाने स्पष्ट केलं
www.konkantoday.com