
बनावट पासेस बनवून देणाऱ्या रॅकेटचा मुंबई क्राईम ब्रँचने सिंधुदुर्ग पोलिसांच्या मदतीने केला पर्दाफाश
बनावट पासेस बनवून देणाऱ्या रॅकेटचा मुंबई क्राईम ब्रँचने सिंधुदुर्ग पोलिसांच्या मदतीने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी सर्फराज हसन शेख (वय- ३७, रा. हडी, ता. मालवण) याला मालवण पोलिसांनी अटक केली आहे. तर अब्दुल करीम मोहम्मद शेख ( वय- २८), समीर समशुद्दीन शेख (वय- ३०) आणि नूर मोहम्मद शेख (वय- ३०, सर्वजण मूळ रा.हडी, ता.मालवण) या तिघांना मुंबई क्राईम ब्रँचने तपासासाठी आपल्या ताब्यात घेतले आहे. या रॅकेट मध्ये सहभागी असलेले आणखी काही आरोपी मुंबई क्राईम ब्रँचच्या रडारवर असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली आहे. मालवण पोलिसांच्या अटकेत असलेल्या सर्फराज याला न्यायालयाने सोमवार पर्यँत पोलीस कोठडी सुनावली आहे. मुंबई क्राईम ब्रँचने स्वतः प्रवासी बनून या रॅकेटचा पर्दाफाश केला. पोलिसांच्या या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. मुंबईत टॅक्सी चालक म्हणून काम करणाऱ्या युवकांमार्फत हे रॅकेट चालवले जात असल्याचे तपासात समोर येत आहे.
www.konkantoday.com