![](https://konkantoday.com/wp-content/uploads/2021/06/img_3756.jpg)
वादळानंतर पंधरा दिवसांनी आलेली केंद्रीय कमिटी नदीतले मासे खायला आले की समुद्रातील, हे मला माहित नाही -नामदार उदय सामंत
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणाला २५२कोटींची मदत जाहीर केली. त्यानंतर १५ दिवसांनी केंद्राची कमिटी आली. पण कमिटीने जेवणावर ताव मारला. आता ते नदीतले मासे खायला आले की समुद्रातील, हे मला माहित नाही”, असा मिश्किल टोला उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी लगावला. उदय सामंत सोमवारी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलामहाराष्ट्र सरकारने तौक्ते वादग्रस्तांना २५२ कोटींचे पॅकेज दिलेकेंद्र सरकारने देखील तशीच मदत करावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोकणात आले नाहीत. महाराष्ट्रामध्ये भाजपचे सरकार नसल्याने मोदी आले नसतील. त्यांनी गुजरातला १ हजार कोटींची मदत केली. त्यातील ५०० कोटी महाराष्ट्रला मदत केली असती तर आम्ही धन्य झालो असतो”, असं उदय सामंत म्हणाले
www.konkantoday.com