
लोटेतील ऍक्विला ऑरगॅनिक कंपनीत साहित्य चोरी, तिघांवर गुन्हा.
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील ऍक्विला ऑरगॅनिक प्रा. लि. कंपनीच्या गोडावूनमधून तिघा अज्ञात चोरट्यांनी १ लाख १६ हजार २५१ रुपयांचा ऐवज लंपास केला. त्यानुसार शनिवारी सायंकाळी उशिरा तिघांवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरीप्रकरणाचाही छडा लावण्यासाठी पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. यातील तिघाही संशयितांच्या लवकरच मुसक्या अवळू असा विश्वासही पोलिसांनी व्यक्त केला आहे.www.konkantoday.com