चिपळूण अर्बन को. ऑप. बँकेच्या अध्यक्षपदी राधिका पाथरे यांची निवड होण्याची शक्यता 

चिपळूण ः शहरातील चिपळूण अर्बन को. ऑप. बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी १९ जून रोजी सभेचे आयोजन करण्यात आले असून बँकेच्या ८५ वर्षाच्या इतिहासात प्रथमच महिलेला अध्यक्षपदासाठी संधी मिळणार असून यामध्ये ज्येष्ठ संचालिका राधिका पाथरे यांची निवड होण्याची शक्यता आहे.
चिपळूण अर्बन को. ऑप. बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अजून एक वर्षाची मुदत आहे. या एक वर्षाच्या मदतीमध्ये अध्यक्षपदासाठी बँकेमध्ये खांदेपालट होणार आहे.
सध्या बँकेचे अध्यक्षपद ज्येष्ठ संचालक सतीशअप्पा खेडेकर यांच्याकडे आहे. मात्र पुढील एक वषर्घच्या कालावधीसाठी हे पद सौ. पाथरे यांच्याकडे दिले जाण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button