पुण्याजवळ मुळशी एमआयडीसीत सॅनिटायझर बनविणाऱया एसव्हीएस अँक्वा टेक्नॉलॉजिस कंपनीत शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत १८ कामगारांचा होरपळून मृत्यू
सॅनिटायझर बनविणाऱया एसव्हीएस अँक्वा टेक्नॉलॉजिस कंपनीत शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत १८ कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास मुळशी एमआयडीसीतील उरवडे गावातील कंपनीत आग लागली होती. आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. अद्यापही काही बेपत्ता कामगारांची शोधमोहीम सुरू असून, मृतांची संख्या वाढण्याची भीती प्रशासनाने व्यक्त केली आहे. दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केली आहे.
www.konkantoday.com