केंद्र सरकारच्या विरोधात व इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करणार्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
प्रशासनाची परवानगी न घेता केंद्र सरकारच्या विरोधात पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात घोषणा देऊन आंदोलन करणारे रत्नागिरी जिल्हा कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय भोसले यांच्यासह दहा जणांवर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे
काल जिल्हा काँग्रेसच्यावतीने काँग्रेस भुवन येथे इंधन दरवाढीच्या विरोधात व केंद्र शासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले हे आंदोलन करताना प्रशासनाची परवानगी न घेता नियमाचे उल्लंघन केल्याने या आरोपावरून रत्नागिरी शहर पोलिसांनी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष विजय भोसले, दीपक राऊत ,अशोक जाधव ,अश्विनी आगाशे ,कपिल नागवेकर ,रुपाली सावंत ,सुष्मिता सुर्वे ,तेजश्री गोतम ,सचिन मालवणकर ,रिझवान शेख या दहा काँग्रेस कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे रत्नागिरी येथे काँग्रेस कार्यकर्त्यानी रत्नागिरीतील काँग्रेस भवन व रहाटाघर येथे केंद्र शासनाच्या विरोधात आंदोलन केले होते राज्यात आघाडीचे सरकार असूनही त्यामध्ये सहभागी असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या विरोधातच गुन्हा दाखल झाल्याने हा चर्चेचा विषय झाला आहे
www.konkantoday.com