आता शिरगाव भागातही महावितरणच्या केबलसाठी खोदून वरवर बुजविलेल्या तकलादू साईडपट्टी मुळे वाहने रुतू लागली
रत्नागिरी शहरातील साईटपट्टीच्या निष्कृष्ट कामामुळे काही भागात कचरा गाडी व ट्रॅक्टर रुतण्याचे प्रकार झाले होते आता रत्नागिरीजवळील शिरगांव गावात महावितरणच्या भुयारी केबल टाकण्याच्या कामामुळे आता ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे महावितरणच्या भुयारी केबल टाकण्याचे काम शिरगाव येथे लीना पॉवर टेक कंपनीतर्फे करण्यात आले पावसाच्या तोंडावर ग्रामस्थांनी विरोध करून देखील चर खोदण्याचे काम सुरू ठेवले होते त्यानंतर केबल टाकण्याचे काम झाल्यानंतर हे चर वरवर बुजवण्यात आले त्यामुळे मध्यंतरी पडलेल्या वादळी पावसाच्या वेळी चरातील मातीडांबरी रस्त्यावर येऊन चिखल झाल्याने वाहतूक बंद पडली होती केबल खोदाईचे काम पूर्ण झाल्यानंतर हे चर व साईडपट्ट्या दगड टाकून नीट भरणे आवश्यक होते परंतु हे चर माती टाकून वरवर बुजावण्यात आल्या असे काम होऊनही महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आता पावसाळ्यात या साइडपट्टीवरून जात असताना वाहनाची चाके चरात रुतत आहेत शिरगाव मराठी शाळेजवळ डंपर जात असताना साइडपट्टीत त्याचे चाक रुतल्याने तो अडकून बसला कंत्राटदाराने केलेल्या या कामामुळे व आता पावसाळा सुरू झाल्याने ग्रामस्थांना हा नाहक त्रास सहन करावा लागणार आहे
www.konkantoday.com