
शेतकर्याची पेट्रोलसाठी प्रशासनाकडून अडवणूक -बविआचे जिल्हाप्रमुख तानाजी कुळये यांची तीव्र नाराजी
आता तर पावसाला सुरूवात झाल्याने खरीपातशेतीची कामे प्रारंभ झालेला आहे. शेतकऱ्यांनी कर्जकाढून पॉवरट्रिलर सारखी अवजारे खरेदी केलेली आहेत. परंतु त्याअवजारांसाठी लागणारे इंधन पेट्रोलपंपात देणे प्रशासनाने बंदकेलेले आहे. पंपात पोलीस कर्मचारी ठेवून कुठल्याही
शेतकऱ्याला पेट्रोल मिळणार नाही याची व्यवस्था केल्याचे बविआचे जिल्हाप्रमुख व एक शेतकरी तानाजी कुळये यांनी तीव्रनाराजी व्यक्त केली आहे.एक प्रकारे शेतकऱ्यांनी जगावं की मरावं अशा अवस्थेतप्रशासनाने शेतकऱ्यांवर हुकूमशाही सुरू केलेली असल्याचेसांगितले.जिल्ह्यातीलप्रशासनआणित्यांनानाचवणारेलोकप्रतिनिधी यांना येथील नागरिकांच्या उभ्या ठाकणाऱ्यासमस्यांचे कोणतेही सोयरेसुतक नसल्यासारखे वागत आहेत.व्यापारी वर्गाशी चर्चा करून लॉकडावून लावला जातो, पणयेथील सामान्य शेतकऱ्यांशी कधी चर्चा करणार? असा सवालतानाजी कुळ्ये यंनी केला आहे. शेती हंगामासाठी नियोजनकरणे आवश्यक असताना पशासन अपयशी ठरले आहे. गेले
दोन महिनेसर्वसामान्यमाणसांबरोबरच येथील शेतकरी,कष्टकरी लॉकडावून काळात घरी आहेत. हाताला काम नाही,त्यामुळे पैसा नाही, पैसा नाही म्हणून किराणा नाही.अशापरिस्थितीत नैराशेच्या गर्तेत अडकलेला आहे. अनेक सामान्यकुटुंबे उध्वस्तहोण्याच्या स्थितीतआहेत.पोलिसांनीहीशेतकऱ्यांशी सौजन्याने वागावे, शेतीसाठी
लागणारे बियाणे, पॉवर ट्रिलर, खते, इंधन आदी कृषी विषयकखरेदीसाठी ये-जा करत असतात त्यामुळे शेतकऱ्यांची जरअशापकारे अडवणूक होत असेल तर त्यांना शेतीसाठी
पेट्रोल-डिझेल जिल्हा पशासनाने उपलब्ध करून देण्याची मागणीही कुळ्ये यांनी केली आहे
www.konkantoday.com