रत्नागिरी जिल्ह्यात कांदळवन कक्षामार्फत कांदळवन उपजीविका निर्माण योजना
रत्नागिरी जिल्ह्यात कांदळवन कक्षामार्फत कांदळवन उपजीविका निर्माण योजना राबविली जात आहे.
जिल्ह्याला १६० किलोमीटरचा किनारा आहे. त्यावरील अडीच हजार हेक्टर कांदळवने संरक्षित ठेवण्यासाठी वरील उपक्रम महत्त्वपूर्णराबविले जाणार आहेत
रत्नागिरी जिल्ह्यातील खाडीभागातील गावांमध्ये विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. या प्रकल्पांची सुरवात गतवर्षी करण्यात आली. या योजनेतून खेकडापालनाचे १०१, पर्यटनाचे ४७, शोभिवंत माशांचे ७०, कालव्यांचे १०३ तर जिताडा माशांचे ७० प्रकल्प राबविण्याचा निर्णय कांदळवन कक्षाने घेतला आहे.
गतवर्षीच्या प्रकल्पांतून आता सुमारे ४०० लाभार्थ्यांना उत्पन्न सुरू झाले आहे. यात जिताडापालन, खेकडापालन, कालवेपालन अशा विविध प्रकल्पांचा समावेश आहे.
www.konkantoday.com