कोकण रेल्वे मार्गावर नविन गाडी सुरू झाली की उद्घाटनाच्या फेरीत प्रवास करण्याचा प्राध्यापक उदय बोडस यांचा विक्रम हुकणार
इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करून देणारे अनेक अवलिया असतात अनेक वर्षे स्वप्न असलेले कोकण रेल्वे सुरू झाल्यापासून सुरू होणाऱ्या नवीन गाडीच्या उद्घाटनाच्या फेरीत प्रवास करणारे रत्नागिरी येथील उदय बोडस हे असेच एक अवलिया आहेत
कोकण रेल्वे मार्गावर नविन गाडी सुरू झाली की उद्घाटनाच्या फेरीत प्रवास करण्याची प्राचार्य उदय बोडस यांची परंपरा यावेळी मात्र कोविड निर्बंधांमुळे खंडित होणार आहे कोकण रेल्वे सुरू झाली तेव्हापासून सुरू झालेल्या पहिल्या गाडीतून पहिले प्रवास करणारे बोडस याने ही पुढे परंपरा तशीच चालू ठेवली होती आता. १० जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- मडगाव या नविन एल एच बी डब्यांच्या जनशताब्दी एक्सप्रेस या गाडीने त्यांना प्रवास क्विडच्या निर्बंधांमुळे करता येणार नाही. जर तसा प्रवास करता आला असता तर तो त्यांचा २२ वा उद्घाटनाचा प्रवास ठरला असता.
जून 2019 मध्ये जेव्हा कोकणकन्या/ मांडवी एक्सप्रेस चे नविन एल एच बी डब्यांच्या गाडीत परिवर्तन झाले तेंव्हा प्राध्यापक उदय बोडस यानी मडगाव येथून उद्घाटनाचा प्रवास केला होता. तो त्यांचा २१ वा उद्घाटनाचा प्रवास होता. त्यानंतर कोकण रेल्वे मार्गावर बदल होऊन नविन सुरू होणारी जनशताब्दी एक्सप्रेस ही गाडी मात्र कोविड निर्बंधांमुळे हुकणार आहे.
www.komkantoday.com