
अनधिकृत वास्तव्य करणाऱ्या परप्रांतीय लोकांची ग्रामस्थांनी केली हकालपट्टी
एच एनर्जी गॅस पाईपलाइन टाकण्यासाठी गुहागर पाटपनहाळे येथे वास्तव्यास असलेल्या परप्रांतीय कामगारांची स्थानिक ग्रामस्थांनी हकालपट्टी केली.ग्रामस्थांच्या मते या परप्रांतीयांची स्थानिक पोलिस स्टेशन अथवा ग्रामपंचायतमध्ये कुठेही नोंद नाही.त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी ते वास्तव्यास आहेत त्या घराची व्यवसाय घरपट्टीही भरलेली नाही.घरमालक हे मुंबईला वास्तव्यास असतात त्यांना या ठिकाणी राहत असलेल्या परप्रांतीय लोकांविषयी काही माहिती नव्हती.गावातील एकावर विश्वास ठेवून त्यांनी आपल्या घराची चावी त्यांना दिली होते.
www.konkantoday.com