
रत्नागिरी तालुक्यातील आंबा व्यावसायिकांत शासनाच्या भूमिकेविरुद्ध नाराजी
निसर्गाच्या अवकृपेमुळे गेली अनेक वर्षे संकटात सापडलेल्या आंबा व्यावसायिकाला यंदाही ऐन हंगामात आलेल्या ताउक ते चक्रीवादळामुळे मोठे नुकसान सहन करावे लागले. मात्र याकडे शासनाचे लक्ष नसून शासनाच्या या भूमिकेविरुद्ध आक्रमक घेण्याची भूमिका रत्नागिरी तालुक्यातील आंबा व्यावसायिकांनी घेतली आहे.विविध समस्यांवर आंबा बागायतदार, शेतकरी गेल्या काही वर्षांपासुन झगडत आहे परंतु सरकारने अजूनपर्यंत कोणाहीती मदत केलेली नाही. यावर स्थानिक आमदार, खासदार यांनीसुद्धा दुर्लक्ष केले आहे.
आंबा बागायतदार, शेतकरी यांचे सर्व कर्ज माफ करण्यात यावे अथवा त्यामधे सवलत देण्यात यावी. पुढील सर्व कृषी कर्जे ही पाच टक्के दराने आकारण्यात यावीत. या सर्व मागण्यांच्या गांभीर्याने विचार आणि कार्यवाही झाली नाही तर येणार्या प्रत्येक निवडणुकीत आंबा आंबा बागायतदार, शेतकरी वेगळा विचार करतील असा इशारा देण्यात आला
www.konkantoday.com