दापोलीत क्रिकेटची विभागीय अकादमी सुरू करणार : आ. रोहित पवार यांचे आश्‍वासन.

राज्याच्या कानाकोपर्‍यात असलेल्या गुणवान क्रिकेटपटूंना राष्ट्रीय स्तरावर येण्यासाठी संधी मिळावी या उद्देशाने महाराष्ट्र क्रिकेट संघटना ही पुणे येथे एक प्रशिक्षण अकादमी सुरू करणार असून राज्याच्या विविध भागांमध्ये ४ विभागीय अकादमी सुरू केल्या जाणार आहेत. यापैकी एक अकादमी ही दापोली तालुक्यातील वाघवे येथे रॉयल गोल्डफिल्ड संकुलात सुरू होणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी केली.

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने महाराष्ट्र प्रिमियर लीग व वुमन्स महाराष्ट्र प्रिमियर लीग या स्पर्धांचे आयोजन लवकरच करण्यात येणार असून या लीगच्या वेळापत्रकासंदर्भात माहिती देण्यासाठी रॉयल गोल्डफिल्ड येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आगामी काळात राबविण्यात येणार्‍या उपक्रमांविषयी माहिती देताना संघटनेचे अध्यक्ष आमदार रोहितदादा पवार म्हणाले की, महाराष्ट्र क्रिकेट संघटना ही गेल्या काही वर्षात बदलत चालली असून या संघटनेच्या अंतर्गत येणार्‍या २१ जिल्ह्यामधील गुणवंत क्रिकेटपटूंचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button