रत्नागिरीतील रुग्णवाहिका भाडे प्रकरण तापणार ,स्वत च्या स्वार्थासाठी लोकांना वेठीस धरणार्या विरोधात कायद्याने लढणार सामाजिक कार्यकर्ते रमजान गोलंदाज यांचे प्रति आव्हान
रत्नागिरी शहरातील रुग्णवाहिकाचालक अव्वाच्या सव्वा भाडे घेत असल्याचा आरोप पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते रमजान गोलंदाज यांनी सोशल मिडीयावर केल्याने रुग्णवाहिका चालक संघटनेने आज दुपारपासून काम बंद केले होते त्यानंतर नामदार उदय सामंत व भैय्याशेठ सामंत यांनी मध्यस्थी केल्यानंतर रुग्णवाहिका चालकानी काम बंदचा आपला निर्णय मागे घेऊन रुग्णवाहिका सेवा सुरू केली असे असले तरी अजूनही आरोप प्रत्यारोप सुरू आहेत या विषयावर आवाज उठवणारे पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते रमजान गोलंदाज यांनी याबाबत करत खुलासा करत रुग्णवाहिका संघटनेच्या अध्यक्षांना कुराणावर शपथ घेऊन जास्त पैसे घेतले नाहीत हे जाहीर करा असे प्रतिआव्हान दिले आहे तसे केल्यास आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत आपण कान धरून चालत येऊन आपली चूक कबूल करू असे आव्हान गोलंदाज यांनी दिले आहे या विषयात सर्वसामान्य लोकांच्या समस्या व तक्रारीत होत्या अँपेक्स हॉस्पिटल ते स्मशानभूमी असे रुग्णवाहिकेसाठी दोन हजार रुपये घेतल्याचे पुरावे आपल्याकडे आहेत असे पुरावे आपण संघटनेच्या अध्यक्षांना देण्यास तयार आहोत याबाबतच्या तक्रारी आठ दिवसांपूर्वी तोंडी स्वरुपात आपण लोकप्रतिनिधींकडे व अधिकार्यांकडे याआधी मांडल्या होत्या परंतु त्याकडे दुर्लक्ष केले गेले असाही आरोप गोलंदाज यांनी केला आहे
जनतेवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण बातमी प्रसिद्ध केली यात बदनामी करण्याचा कोणताही प्रश्न नसून या प्रकरणात खरे प्रशासनाने दखल घेणे जरुरीचे होते
.लोकांच्या समस्या मांडणे जर चुक असेल तर मला फासावर चढवा. पण लोकांना होणारा त्रास आता सहन करणार नाही. यावर प्रशासनाने पुढे येऊन चौकशी करणे गरजेचे होते.
रुग्णालयात येणारा प्रत्येक रुग्णाची परिस्थिती चांगली नसते. पण काही रुग्णावाहीका वाल्यांकडून त्याचा विचार केला जात नाही ते सगळ्यांना एकाच चष्मामधून बघतात आज कोरोनाच्या काळात लोकांची परीस्थितीचा विचार करणे गरजेचे आहे. कारण माणुसकी पेक्षा दुसरा कोणता मोठा धर्म नाही. मी जर खोटी बातमी दिली असेल तर माझ्यावर कारवाई करावि आणि मी जर पुरावे दिले तर या खासगी रुग्णावाहीका वाल्याचे परवाने रद्द करणार काय? तुम्ही देत असणारी सेवेची आम्हाला त्याची जाणिव आहे मात्र पैश्यावर घोडे अडलंय. शासनाने तुम्हाला काय दिले? काय नाय दिले म्हणून तुम्ही ते घेण्यासाठी लोकांना वेठीस धरू नका. मात्र लोकांना एवढं वेठीस धरण्याचा निर्णय संघटनेने घेतलाच असेल तर मी सोमवारी मा. जिल्हाधिकारी आणि उपप्रादेशिक कार्यालय रत्नागिरी येथे या सगळ्यां रुग्ण वाहिका वाल्यांची नियमानुसार तक्रार करणार असून वेळ पडल्यास आपत्ती व्यवस्था कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी प्रशासनाला भाग पडणार असल्याचे गोलंदाज यांनी म्हटले आहे
www.konkantoday.com