
मंत्री उदय सामंत आणि भैय्याशेठ सामंत यांच्या विनंतीवरून आमचे काम सुरू राहणार,कोणालाही अडचण येणार नाही – तन्वीर जमादार अध्यक्ष रूग्णवाहिका संघटना
गेले वर्षभर आम्ही सर्व रुग्णवाहिका चालवणारे या कोविडच्या संकटामध्ये कोणाचीही अडवणूक न करता ,कोणतीही भीती मनात न बाळगता एक सामाजिक काम,दुःखात असलेल्या कुटुंबाला मदत हा दृष्टिकोन बाळगून प्रामाणिकपणे काम करत आलो आहोत.असे काम करत असताना रुग्णवाहिका चालकांच्या विरोधात बदनामी करणाऱ्या बातम्या होत असतील तर आमची मन का दुखावणार नाहीत ?,आम्ही पण माणूस आहोत !आमचा पण जीव आहे ! पण आम्ही कधीच हे काम करत असताना आमच्या जीवाची पर्वा केली नाही.रुग्णवाहिका चालकांच्या विषयी तक्रारी असतील तर बदनामी करण्या अगोदर माझ्याशी संपर्क करा.असे आवाहन रुग्णवाहिका संघटनेचे अध्यक्ष तन्वीर जमादार यांनी केले आहे
या नंतर कोणत्याही रुग्णांना रुग्णवाहिका चालकांकडून अडचण निर्माण होणार नाही ही संघटनेचा अध्यक्ष म्हणून मी ग्वाही देताे असेही जमादार यांनी सांगितले आहे
रत्नागिरी येथील रुग्णवाहिकाचालक रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा भाडे घेतात असा त्यांच्यावर आरोप होत होते त्यामुळे नाहक बदनामी झाली म्हणून आज दुपारपासून रुग्णवाहिका चालकांनी आपले काम थांबवले होते तसेच काेविडचे रुग्ण नेण्यास नकार दिला होता त्यानंतर या प्रकरणात नामदार उदय सामंत व भैय्याशेठ सामंत यांनी लक्ष घातले होते त्यामुळे रुग्णवाहिका संघटनेने आपले काम पुढे चालू ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे दरम्यान जास्त भाडे आकारण्याचा प्रकार घडल्यास संबंधितांनी अध्यक्षांकडे संपर्क करावा असे आवाहन त्यांनी केले आहे
www.konkantoday.com