
ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात मध्यवर्ती ठिकाणी लसीकरण शिबीरे आयोजित करण्याची मागणी
सध्या विविधि ठिकाणी ग्रामिण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रावर नागरीकांसाठी लसीकरण सुरू आहे.
लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागाची जीवनवाहीनी एस टी बस सेवा बंद असल्यामुळे सर्वच स्तरातील नागरीकांना लसीकरण घेण्यासाठी आरोग्य केंद्रावर येणे शक्य होत नाही.
प्रत्येक ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात मध्यवर्ती ठिकाणी लसीकरण शिबीरे आयोजित करावी अशी सर्वसामान्य जनतेची आग्रहाची मांगणी आहे.यामुळे ग्रामस्थांना आरोग्य केंद्रावर येण्याजाण्याचा त्रास वाचेल व खासगी वाहनचालकांकडून होणारी होणारी पिळवणूक थांबेल.तसेच प्रत्येक गांव १००% कोरोनामुक्त होण्यास मदत होईल याबाबत प्रशासनाने लवकरात लवकर कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे
www.konkantoday.com