
खाजगी बस उलटल्याने ७ जण जखमी
रत्नागिरी ः मुंबई-गोवा महामार्गावर पाली कापडगांव जवळ गजांतलक्ष्मी ट्रॅव्हल्सची बस रस्ता सोडून खाली जावून पलटल्याने या अपघातात बसमधील ७ जण जखमी झाले आहेत. गजांतलक्ष्मी ट्रॅव्हल्सची ही बस बोरीवलीहून शिरोड्याकडे जात होती ही बस पालीजवळ आली असता चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि ही बस रस्ता सोडून खोलगट भागात जावून उलटली. या अपघातात उदय गावडे, विशाल रामाणे, लॉरेन्स रॉड्रीक्स, तेरेजीन फर्नांडीस, ऍलेक्स फर्नांडीस, रीटा मँटेरो हे जखमी झाले असून त्यांच्यावर पाली येथील ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. गाडीत एकूण २४ प्रवासी होते.