महषी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या विद्यार्थिनींची कॉग्निझंट टेक्नॉलॉजी सोलुशन्स मध्ये निवड

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अँपलीकेशन्स फॉर वुमेन (बी.सी.ए.)शिरगाव, रत्नागिरी येथील टी.वाय.बी.सी.ए. च्या विद्यार्थिनीसाठी मागील अकरा वर्षापासून कॅम्पस प्लेसमेंटअंर्तगत विप्रो,इन्फोसिस,कॉग्नीझंट,टीसीएस,ॲटॉस,पटनी इ.बहुराष्ट्रीय कंपनींच्या इन्टरव्हयुवचे आयोजनकरण्यात येते. पुणे येथील के.बी. जोशी इन्स्टिटयूट ऑफ आयटी (बी.सी.ए.) यांच्या संयुक्त विद्यमानेकॉग्निझंट टेक्नॉलॉजी सोलुशन्स या कंपनीच्या कॅम्पस इंटरव्हयूंचे पुणे येथे आयोजन करण्यात आले होते व यामध्ये बी.सी.ए. महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी ऑनलाईन सहभागी झाल्या होत्या.कॉग्निझंट टेक्नॉलॉजी सोलुशन्स तर्फे घेण्यात आलेल्या ऑनलाईन लेखी व इंटरव्यू परिक्षेतून
टी.वाय.बी.सी.ए.च्या कु. आजिया सोलकर व कु. प्राजक्ता चिले या विद्यार्थिनींची निवड झाली.
या विद्यार्थिनीला बी.सी.ए. प्र.प्राचार्या कु.स्नेहा कोतवडेकर व सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थिनींनी मिळविलेल्या यशाबद्दल रत्नागिरी प्रकल्पाचे प्रकल्प प्रमुख मा.श्री.मंदार सांवतदेसाई तसेच
संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठीशुभेच्छा दिल्या.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button